पुणे

सेलिब्रिटिंना लाइक्‍स, फॉलोअर्सची विक्री 

पांडुरंग सरोदे : सकाळ वृत्तसेवा

पुणे- चित्रपट क्षेत्रातील सेलिब्रिटिंचे सोशल मिडीयावर बनावट प्रोफाइल बनवून त्यांना फेक फॉलोअर्स, लाइक्‍सची विक्री करणाऱ्या काही जनसंपर्क संस्था (पीआर एजन्सी) व कंपन्यांचे पितळ उघडे पडू लागले आहे. याच स्वरूपाचा "सोशल मीडिया मार्केटिंग इफेक्‍टर्स फ्रॉड' असा गुन्हा मुंबई पोलिसात दाखल झाल्याने फेक फॉलोअर्सचा "झोल' करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. 

फेसबुक, ट्‌विटर, इन्स्टाग्राम, टिकटॉक अशा सोशल मीडियाद्वारे आपल्यावर लाखो चाहते प्रेम करतात, असंख्य लाइक्‍स मिळतात आणि अचानक फॉलोअर्सची संख्या झपाट्याने वाढते. काही नामवंत सेलिब्रिटिंच्या बाबतीत हे सगळे घडते. मात्र ते इतक्‍या झटपट कसे घडते, याकडे गांभीर्याने पाहिले जात नव्हते. मात्र अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येचे प्रकरण गाजत असतानाच हिंदी चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायिका भूमी त्रिवेदी हिने तिच्या बनावट प्रोफाइलबद्दल तक्रार केल्यानंतर या प्रकाराकडे पोलिसांचे लक्ष गेले. त्यानंतर पोलिसांनी एकाला अटकही केली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लाखो रुपये मोजले जातात 
पोलिसांनी संबंधित व्यक्तीची चौकशी केल्यानंतर हिंदी चित्रपट क्षेत्रातील सेलिब्रिटिंना सोशल मीडियावर बनावट फॉलोअर्स, लाइक्‍सची विक्री करण्याचे काम चित्रपटाशी संबंधित काही संस्था किंवा कंपन्या करत असल्याचे समोर आले. एखादा नवोदित कलाकारच नव्हे तर नामवंत कलाकारही लाखो रुपये मोजून फेक फॉलोअर्स, लाइक, रिट्‌वीट विकत घेत असल्याची माहिती काही जणांनी दिली. मुंबई पोलिसांनी अशा 50 हून अधिक संस्था व कंपन्यांना याच प्रकरणात चौकशीसाठी बोलावले होते. दरम्यान, हिंदी चित्रपटसृष्टीतील काही सेलिब्रिटिंनी सोशल मीडियाची उपस्थिती वाढवण्यासाठी विविध कंपन्यांची सेवा विकत घेतल्याची चर्चा आहे. असे असले तरीही हा प्रकार भारतीय दंड संहिता व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा ठरू शकतो. 

ही तर चाहत्यांची फसवणूक 
याबाबत चित्रपटप्रेमी चेतन बागूल म्हणाला, ""एखाद्या कलाकाराची भूमिका आवडते, म्हणून आम्ही त्यांना सोशल मीडियावर पाठिंबा देतो; पण कोणी खोट्या पद्धतीने फॉलोअर्स मिळवत असतील तर ती आमच्यासारख्या चाहत्यांची सरळसरळ फसवणूकच आहे.'' 

फेक फॉलोअर्स कशासाठी ? 
- चित्रपट, मालिका, वेबसिरिजच्या प्रसिद्धीसाठी 
- प्रभावशाली व्यक्तींमध्ये स्थान मिळविण्यासाठी 
- स्वतःचा "ब्रॅण्ड व्हॅल्यू' वाढवून जादा मानधन घेणे 
- चाहत्यांचे जास्तीतजास्त लक्ष वेधणे 
- स्वत:चा आर्थिक फायदा व प्रतिष्ठेसाठी 
- गूगलमध्ये रॅंकिंग वाढविण्यासाठी 
- अधिक क्‍लिक्‍स, लाइक्‍स, रिट्‌वीट मिळविण्यासाठी 

महामंडळ घेणार गृहमंत्र्यांची भेट 
फेक प्रोफाइल, फॉलोअर्स हे सर्व प्रसिद्धीसाठी केले जाणारे खोटे प्रकार आहेत. त्यातून कलाकारांना कुठलाही फायदा होत नाही. हा प्रकार म्हणजे कलाकारांच्या खऱ्या चाहत्यांची अप्रत्यक्षरीत्या फसवणूकच आहे. याबाबत आम्ही गृहमंत्री अनिल देशमुख यांना निवेदन देऊन खोट्या प्रसिद्धीद्वारे चाहत्यांची फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी करणार असल्याचे  अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी सांगितले. 

फेसबुक, ट्‌विटर, इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियाचा वापर बनावट प्रोफाइल, फेक फॉलोअर्स, लाइक्‍स अशा पद्धतीने खोट्या प्रसिद्धीसाठी केला जात असल्याची काही प्रकरणे पुढे आली आहेत. माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार हा प्रकार फसवणुकीचा होतो. तो एक गुन्हा आहे. त्यामुळे कोणीही अशा खोट्या प्रकारांना थारा देऊ नये. 
- बालासिंग राजपूत,  पोलिस अधीक्षक, महाराष्ट्र सायबर पोलिस 

अभिनयात 10 ते 12 वर्ष स्ट्रगल केल्यानंतर अन गुणवत्तेच्या जोरावर चाहत्यांची संख्या वाढत असते. मात्र, बनावट पद्धतीने फॉलोअर्स, लाइक मिळविणे म्हणजे चाहत्यांची फसवणूकच आहे. त्यामुळे गुणी कलाकारांवर अन्याय होतो. एक मात्र नक्की की सोशल मीडिया पलीकडेही जग आहे. तेव्हा बनावट लाइक्‍स मिळविणाऱ्यांना ते कुठे आहे, हे समजल्याशिवाय राहणार नाही. 
- सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW: टीम इंडियाच्या नारी शक्तीचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा वन डे क्रिकेट इतिहासात असा पराभव कुणी केलाच नव्हता...

Archana Kute: 'ज्ञानराधा मल्टिस्टेट'च्या अर्चना कुटेंना पुण्यातून अटक; छाप्यात काय-काय सापडलं?

Nude Party: न्यूड पार्टीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल; संशयित आयोजकांना अटक

PAK vs UAE Live: बिचारे... PCB ने खेळाडूंना तोंडावर पाडले, बॅगा घेऊन स्टेडियमवर पोहोचले; मॅच रेफरी Andy Pycroft च राहिले, टॉसही हरले

Latest Marathi News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT